हायकोर्टाने तुकाराम मुंढेंच्या FDA ला झापलं! ‘या’ कंपनीवरील औषधविक्री बंदी मागे, कोर्ट म्हणालं, ‘रुग्णांना 20 दिवस…’
‘आधी गोळी झाडायची आणि नंतर प्रश्न विचारायचे’ ही पद्धत ‘वाइल्ड वेस्ट’मध्ये चालू शकते; मात्र कायद्याच्या क्षेत्रात ती चालणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आयुक्त असलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला मंगळवारी फटकारले. कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या विविध औषधांच्या विक्री व वितरणावर घातलेल्या ‘विक्री बंदी’च्या आदेशांवरून न्यायालयाने एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली….
