‘मी तुझ्या वडिलांना मारलंय, आता तुझा नंबर,’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकींना धमकी; गँगस्टरने पाठवली व्हॉइस नोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगज नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. परदेशातू कारवाया करणारा गँगस्टर झिशान अख्तर याने ही धमकी दिल्याचं समजत आहे. झिशान अख्तर याने सोशल मीडियावर ‘व्हॉइस नोट’त्या माध्यमातून ही धमकी दिल्याची माहिती आहे. अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील…
