Headlines

बीड – 4 दिवसानंतर विलास घुलेंवर अंत्यसंस्कार, मुलगा निर्दोष असल्याचा खासदार सोनवणेंचा दावा

बीड जिल्ह्यातील केजमधील विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी आता राजकारण चांगलेच तापलं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मुलाचं नाव समोर येताच बजरंग सोनवणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुलगा दोषी असेल तर चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर यात राजकीय षडयंत्र आहे, असा दावा करत  मुलगा सौरभ सौनवणेंनी आरोप फेटाळले आहेत.

विलास घुले यांच्या हत्येच्या चार दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळीत एका आदिवासी तरुणाला वाचवताना टोळक्याकडून विलास घुले यांचा खून झाला. विलास घुले यांचा खून करणारे खासदार बजरंग सोनावणेंचा मुलाचे समर्थक असल्याचा आरोप झाला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करावी आणि बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरभ याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गावक-यांनी आंदोलन केलं. विलास घुले यांचा मृतदेह घेऊन गावक-यांनी केज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं.

 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनीही विलास घुले हत्ये प्रकरणातील सूत्रधाराला पकडण्यात पोलीस अपयशी झाल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आंदोलकांशी चर्चा केली. याशिवाय रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. दुसरीकडं या प्रकरणात मुख्यमंत्री  फडणवीसांच्या एसआयटीची नियुक्ती करण्यात आली. रात्री उशिरा आंदोलन स्थगित करत विलास घुलेच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडं बजरंग सोनावणे आणि त्यांचा मुलगा सौरभ या दोघांनीही या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं.

विलास घुलेंच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी. हत्येत कुणी सूत्रधार असेल तर त्याचा तातडीनं शोध घेऊन त्यांना अटक व्हावी अशी मागणी होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *