मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाण्यातून मार्ग काढताना मुंबईकरांची कसरत होतेय. दरम्यान साकीनाका येथे एक व्यक्ती मेनहोलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरू असून मुंबईतील अंधेरी सबवेखाली पाणी साचलं आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवे भरला आहे. मुंबईत पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री व चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता आहे. MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू होते. दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अस्लम अन्सारी असं या व्यक्तीचं नाव असून ते 45 वर्षांचे असल्याचे समजते.
साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री व चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता आहे. MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू आहे.
व्यक्तीचा मृत्यू
साकीनाका येखे मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
