वेश्याव्यवसाय आणि डान्सबारच्या दलदलीत ढकलण्यासाठी एका पंधरा वर्षांच्या मुलीला सिगारेटचे चटके दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कुर्ला स्थानकावर ही अल्पवयीन मुलगी सापडल्यावर ही माहिती समोर आली. सावत्र वडील आणि भावाकडून लैगिंक अत्याचारही या मुलीवर करण्यात आले आहेत. याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
Read More
पतीनेच मित्राला अल्पवयीन पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीकडून घटस्फोट मिळावा आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेयसीकडे जाता यावं यासाठी पतीने हे धक्कादायक कृत्य केलं. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला. याप्रकरणी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. पीडित पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार करण्यासाठी...
Read More
मागिल वर्षी चाकण येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार झाला होता. तेव्हा काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली आहे. दरम्यान यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे...
Read More
12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचे एक डबा कसारा ते इगतपुरी दरम्यान घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. या अपघातामुळे मध्य रेल्वेवरची मुंबई...
Read More
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जमिनीवरुन झालेल्या या हिंसाचारामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिला आहेत. घोरावल कोतवाली भागात उभ्भा गावात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला आहे. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर घोरावल पोलीस घटनास्थळी...
Read More
काहीही कामधंदा न करता नेहमीच दारूच्या नशेत तर्र होऊन घरात त्रास देणाऱ्या स्वत:च्या तरुण मुलाचा वृद्ध बापानेच गळा दाबून खून केल्याची घटना बार्शी शहरात घडली. हा खुनाचा प्रकार दडविण्याच्या हेतूने मुलाने आत्महत्या केल्याचा बनावही पोलीस तपासात उजेडात आला. पोपट चंद्रकांत जगदाळे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे....
Read More
ऐरोलीतील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. दोघांना घाटकोपर पोलिसांनी अटक करून रबाळे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असून एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. सई गोगळे, मंदार गावडे, मितेश साळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी...
Read More
कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही ना? असा संशय व्यक्त होतो आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास एकाच कुटुंबातली तीन मुलं...
Read More
चारित्र्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशी परिहार असे १९ वर्षीय मृत तरुणीचे नाव असून तिची हत्या करणारा तिचा प्रियकर अशरफ शेख याचा पोलिसांनी अटक केली आहे. आपली प्रेयसी इतर मुलांशी बोलते म्हणून त्यामुळेच चारित्र्याच्या संशयावरुन आपणच तिची हत्या केल्याची कबूली...
Read More
शनिवारी(दि.13) सायंकाळपासून अचानक बेपत्ता झालेल्या १५ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह रविवारी कोपरीतील मिठागर खाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचा खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज कोपरी पोलिसांनी वर्तविला आहे. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम विनोद...
Read More