मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कधी असेल बंद?
सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज दरम्यान 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मुंबई दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.
भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मुंबई दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.
नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक कधी असेल बंद?
सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज दरम्यान 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत नागपूर दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.
भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटस्चेंज दरम्यान 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नागपूर दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.
समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारे दरोडेखोर अद्याप मोकाटच
समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारे दरोडेखोर अद्याप मोकाटच आहेत. तीन ते चार दिवस उलटून देखील दरोडेखोरांना पकडण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना अपयश आले आहे. रक्षाबंधनानिमित्त मुंबईकडे निघालेल्या कुटुंबाला 27 तारखेला रात्री महामार्गावर लुटण्यात आले होते. दरोडेखोरांनी कार अडवून लूट केली होती. कारचे टायर फोडून 10 ते 12 जणांनी कुटुंबाला घेरून त्यांच्याकडील मुद्देमाल चोरुन नेला होता. तब्बल 25 तोळे सोने आणि हजारो रुपयांची रोकड दरोडेखोडांनी लंपास केला होता. या घटनेमुळं महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
