पुणे-सोलापूर महामार्गावरील बिजवडी(ता. इंदापूर) येथे आज (शुक्रवारी,ता 30) सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे काम सुरु असताना भीषण दुर्घटना घडली. कामादरम्यान (Pune Solapur Highway Accident) रस्त्याची माती अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दोन मजूर अडकले. एका मजुराला बाहेर काढण्यात यश आले तर या घटनेत एकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला.(Pune Solapur Highway Accident)
बिजवडी येथे महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याचे काम सकाळी नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यावेळी लगतच्या रस्त्याचा भाग अचानक खचून खाली आला. माती खाली घसरली या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. भरावाखाली मजूर अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. एका मजुराची सुटका करण्यात आली. तो किरकोळ जखमी झाला आहे. तर दुसऱ्या मजूराचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
