नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, नेपाळ पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १०५ भारतीय नागरिकांसह एकूण १००० जण बेपत्ता आहेत.
नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, रसुवामधील ‘भोटे कोशी’ नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे ३८४ पर्यटक बेपत्ता झाले. प्राथमिक अहवालांनुसार, बेपत्ता झालेल्यांपैकी २९१ जण परदेशी नागरिक आहेत. विविध पर्यटन संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एका ठिकाणाहून ५९ भारतीय आणि दुसऱ्या ठिकाणाहून एकूण ४६ भारतीय बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दृश्यांमध्ये मोठ्या इमारती कशा उद्ध्वस्त झाल्या हे दिसून येते; अवघ्या काही सेकंदात सर्व काही नष्ट झाल्याचे यात दिसते.
नेपाळच्या उत्तर भागात तिबेटला लागून असलेल्या भागात ग्लेशिअर बर्स्ट झाल्यामुळे नेपाळच्या भोटे कोशी नदीला प्रलयंकारी पूर आला आहे. यामुळे या भागात राहणाऱ्या ५० हजार लोकांना फटका बसला आहे. या ग्लेशिअर बर्स्टमुळे काही समजण्याच्या आता होत्याचं नव्हतं झालं. पुराने काही इतर रौद्र रूप धारण केले की कोणालाही याचा अंदाज आला नाही. वरील व्हिडिओत एका हॉटलमध्ये असलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक पळताना दिसत आहे. पण पाणी आणि चिखलाचा प्रचंड प्रवाह त्यांना चुकवता आला नाही. सुरक्षित ठिकाणी पोहण्यासाठी काहीच अवधी मिळाला नसल्याचे या धक्कादायक व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
