‘सरकारी मंत्री, अधिकारी, ठेकेदार, बिल्डरांकडून दुष्काळ निधीत पाच-दहा हजार कोटींचे…’; ठाकरेंच्या शिवसेनेचा फडणवीसांना सल्ला
“महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक चांगली भूमिका मांडली आहे. फडणवीसांचे म्हणणे असे आहे की, दुष्काळाच्या परिस्थितीत प्रत्येकाने संवेदनशीलता दाखवून अनावश्यक खर्च टाळावा. लग्नसमारंभ, बारसे, मुंज अशा कार्यक्रमांवर नाहक खर्च न करण्याची, जिथे गरज आहे तिथे आवश्यकतेपेक्षा कमी खर्च करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यातून होणारी बचत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीच्या स्वरूपात वापरता येऊ शकते. केवळ आर्थिक…
