मुंबईच्या समुद्रातून सी-प्लेनचं टेकऑफ, 8 मजल्याचं तरंगतं हॉटेल अन्… काय आहे प्रोजेक्ट मरिना?
मुंबईमध्ये दोन अंतरराष्ट्रीय विमानतळं कार्यन्वयित असतानाच आता चक्क अरबी समुद्रामधून विमानं उड्डाण करणार आहेत. विशेष म्हणजे जागतिक पातळीवरील प्रमुख शहरांच्या धर्तीवर नरिमन पॉइंट येथे विशेष सुविधा उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरुन सी-प्लेनचे उड्डाण होताना दिसणार आहे. खास बाब म्हणजे मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या हॉटेलशी हा सी-प्लेन उड्डाण प्रकल्प जोडला जाणार आहे….
