क्रिकेटच्या मैदानावर दर सामन्यागणिक विक्रम करणारा भारतीय संघाचा कर्णधार व जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहली यानं आज क्रिकेटविश्वातील नवं शिखर ‘सर’ केलं. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये दीड शतक ठोकण्याचा सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम विराटनं आज मोडला. एवढ्यावरच न थांबता, कसोटीतील सातवं द्विशतक ठोकून त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर...
Read More
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन-रविंद्र जाडेजा यांची फिरकी जोडगोळी यांच्या माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम पहिल्या कसोटीत पाचव्या दिवशी आफ्रिकेवर निर्णायक विजय मिळवला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही. आक्रमक...
Read More
दक्षिण आफ्रिकेने कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेरच्या टी २० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. भारताने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. त्यात डी कॉकने नाबाद ७९ धावा केल्या आणि १७ व्या षटकातच आफ्रिकेला विजय मिळवून दिला. या विजयासह तीन...
Read More
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या आणि परदेश दौऱ्यावर सर्वोत्तम कामगिरी करतो आहे. भारतीय संघाच्या या कामगिरीची दखल घेत, BCCI च्या क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौऱ्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, परदेश दौऱ्यावर असताना भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आता दरदिवशी...
Read More
महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी होणाऱ्या चर्चांवर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी मोठं विधान केलं आहे. संघातून धक्के मारुन बाहेर काढण्याआधी धोनीने निवृत्त व्हावं, भारतीय क्रिकेटसाठी धोनीने मोठं योगदान दिलं आहे मात्र आता नवीन पर्यायांचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं, गावसकर India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. “आता भारतीय...
Read More
वर्षभराच्या निलंबनानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलं. ऍशेस सीरिजमध्ये स्मिथने तब्बल ७७४ रन केले. याचबरोबर स्मिथने सुनिल गावसकर यांच्या ४८ वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ३० वर्षांच्या स्मिथने ४ टेस्टच्या ७ इनिंगमध्ये ११०.५७ च्या सरासरीने ७७४ रन केले. यामध्ये ३ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता....
Read More
भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दणका दिला होता. BCCI च्या आचारसंहितेत असलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दिनेश कार्तिकला नोटीस पाठवण्यात आली होती. या प्रकरणी दिनेश कार्तिकने BCCI ची बिनशर्त माफी मागितली आहे. कॅरेबीयन प्रिमीयर लीग स्पर्धेत कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघासोबत दिसला होता....
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची भेट घेतली आणि तिचं कौतुक केलं आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूने २६ तारखेला स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतपदावर आपले नाव कोरले. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहराला २१-७, २१-७ अशा सेटमध्ये हरवत पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पी....
Read More
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने आपल्या वन-डे कारकिर्दीतलं ४२ वं शतक झळकावलं. वन-डे क्रिकेटमध्ये सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून ८ शतकं ठोकायची आहेत. मात्र भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने विराटचा खेळ पाहून एक भविष्यवाणी केली आहे. विराटने दुसऱ्या वन-डे सामन्यात १२० धावा केल्या, त्याच्या खेळीमुळे...
Read More
१२ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकी संघासाठी महत्वाचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी ७१ वर्षांपूर्वी स्वतंत्र भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं होतं. १९४८ आधी भारतीय संघाने १९२८, १९३२ आणि १९३६ अशा ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवली होती, मात्र त्यावेळी भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. १५ ऑगस्ट १९४७ साली...
Read More