खेल
विराटनं रचल्या विक्रमांच्या राशी
क्रिकेटच्या मैदानावर दर सामन्यागणिक विक्रम करणारा भारतीय संघाचा कर्णधार व जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहली यानं आज क्रिकेटविश्वातील नवं शिखर ‘सर’ केलं. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये दीड शतक ठोकण्याचा सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम विराटनं आज मोडला. एवढ्यावरच न थांबता, कसोटीतील सातवं द्विशतक ठोकून त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा द्विशतकांचा विक्रमही मोडला. तसंच, कसोटीतील ७ हजार धावा पूर्ण केल्या. विराटच्या या खेळाच्या जोरावर भारतानं पुणे कसोटीत ५०० हून अधिक धावांचा डोंगर उभारला आहे.