राजनीति
विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे डावखरेंना आव्हान, रविंद्र फाटक यांना उमेदवारी
- 223 Views
- May 17, 2016
- By admin
- in राजनीति, समाचार
- 0 Comments
- Edit
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रविंद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, आता राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध सेना-भाजप युतीचे रविंद्र फाटक अशी लढत पाहायला मिळणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर सेनेकडून रविंद्र फाटक यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून रविंद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.