रत्नागिरीतले तिवरे धरण फुटले; दोघांचा मृत्यू, २३ जण बेपत्ता
- 194 Views
- July 03, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on रत्नागिरीतले तिवरे धरण फुटले; दोघांचा मृत्यू, २३ जण बेपत्ता
- Edit
रत्नागिरीत झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातले तिवरे धरण फुटले आहे. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण बेपत्त झाले आहे. दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या घटनेचा फटका बसला आहे.
ही घटना समजताच वरिष्ठ अधिकारी, पोलीस आणि अभियंते घटनास्थळी दाखल झाले आहेत. धरण फुटल्याने ओवळी, रिक्टोली, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसाचा जोर इतका वाढला की तिवरे धरण फुटले आहे. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने एका बाजूला भगदाड पडले आहे. त्यामुळेच शेजारील गावांमध्ये सतर्कतेचा इशाराही दे्ण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले आहेत.