मुंबईत एक अत्यंत धक्कदायक घटना घडली आहे. मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफसह तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बॉलिवूड हादरले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मुंबईच्या जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात गोळीबार झाला आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह दोघे जण जखमी झाले आहेत. यात टायगर श्रॉफसह त्याचा चालक आणि एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. टायगर श्रॉफ त्याचा कारने जात असताना बाईकवरुन आलेल्या 3 अज्ञान इसमांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफ याच्यासह त्याचा चालक आणि त्याच्या कारच्या बाजूने जाणारा एक रिक्षा चालक देखील जखमी झाला आहे.
मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत माहिती. बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीनी गेळीबार केला. मिस्टर टायगर श्रॉफ सुरक्षित आहेत. त्यांना गोळी लागलेली नाही. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ फायरिंग घटनेचा तपास करण्यासाठी स्पेशल 12 टीम नेमल्या आहेत. बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे. मुंबई बॉलिवूड विश्वावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी फायरिंग केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
टायगर श्रॉफवर भरदिवसा गोळीबार
बॉलिवूडचा मोठा अभिनेता असलेल्या टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. एका अभिनेत्यावर अशा प्रकारे गोळीबार झालेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीच्या बाहेर गोळीबार जाला होता. दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन आल्या आणि त्यांनी सलमानच्या घराबाहेर चार राऊंड फायर केले… त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झालेत
