Headlines

दर 12 वर्षांनी भरणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याचे नामकरण होणार; आता सिंहस्थ कुंभमेळा नव्हे तर…

आगामी कुंभमेळा महाराष्ट्रात होत आहे. नाशिकमध्ये 2027मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात येत आहेत. कुंभमेळ्याची भव्यता अधिक वाढवण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसंच, कुंभमेळ्याचे नामकरण करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

दर 12 वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या साठी राज्य शासनाकडून दीड वर्षांपासून तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यादरम्यान सोयी व सुविधा सुसज्ज राहाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल 34 हजार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. कुंभमेळा यथासांग पार पडावा यासाठी प्रथमच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण देखील स्थापन करण्यात आले आहे. कुंभमेळा भव्यदिव्य व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक सिंहस्थ ऐवजी महासिंहस्थ असे नामकरण केले आहे. त्याचे ब्रेडींग तर करण्यात येणार आहेच, शिवाय बोधचिन्हाची अधिकृतता म्हणून त्यावर ट्रेडमार्कचे शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

भाविक, गुंतवणूकदार आणि देश-विदेशातील नागरिक सर्वांपर्यंतच नाशिकच्या कुंभमेळ्याची महत्ता पोहोचावी आणि या निमित्ताने नाशिकचे ब्रेडींग होऊन भविष्यकालीन शहराच्या विकासाची वाट सुकर व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून रस्ते, महामार्ग आणि रेल्वेचे जाळे विस्तारतानाच नाशिकमध्ये रिंगरोड आणि परिक्रमा मार्ग तर त्र्यंबकेश्वराला दर्शनपथ कॉरिडॉर अशा नव्या संकल्पनांनी यंदा कुंभमेळ्याची कामे नजरेत भरावी अशी उभी राहत आहेत.

कुंभमेळा कामांचा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

कुंभमेळा कामांचा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी नाशिज पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आगामी कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर 30  ते 32 हजार कोटींच्या होणाऱ्या कामांचा गैरफायदा घेऊन मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीने 400 ते  500  कोटींचे बनावट टेंडर काढण्यात आले. 9 ठेकेदारांना काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत 65 लाख रुपये उकळले आहेत. मूळ वर्क ऑर्डरची कॉपी-पेस्ट करून बनावट वर्क ऑर्डरही दिली असल्याचे समोर आले आहे. वर्क ऑर्डर घेऊन ठेकेदार सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे गेल्यानंतर फसवणूक उघड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *