add_action('wp_head', function(){echo '';}, 1); ….तरच मराठा आरक्षणाला पाठिंबा – एकनाथ खडसे – SOCH INDIA
Menu

देश
….तरच मराठा आरक्षणाला पाठिंबा – एकनाथ खडसे

nobanner

मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्या मनातील शंका, संभ्रम अद्यापी पूर्णपणे दूर झालेले नाहीत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर त्यांचीच री ओढत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास स्वागत करु असे म्हटले आहे.

भाजपाच्या दोन्ही नेत्यांच्या या विधानावरुन मराठा आरक्षण कसे लागू होणार त्याची दोन्ही नेत्यांना कल्पना नसल्याचे दिसते. दरम्यान आज सकाळी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठकीत वाद झाल्याचे वृत्त होते. पंकजा मुंडे या उपसमितीच्या सदस्य नसतानाही त्या या बैठकीला हजर होत्या. कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येनुसार आरक्षण द्यावे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावरुन वाद झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्या असे वृत्त आले होते.

पण पंकजा मुंडे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. असा कुठलाही वाद झाला नाही. आपण उपसमितीच्या सदस्य नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही असे त्या म्हणाल्या. मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात आज सादर केले जाणार आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी दीर्घकाळ लावून धरली असून ती आता पूर्ण होणार आहे. अनेक कायदेशीर अडथळे पार करून मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात सादर केले जाईल. अधिवेशन संपण्याआधी विधेयक मांडू आणि कायदा आणू. त