Headlines

Gurugram News: दिवाळीनिमित्त लायटिंग लावताना आक्रित घडलं, इमारतीवरुन पडून BSF DIG च्या 28 वर्षीय लेकाचा करुण अंत

गुरुग्राम येथे ४ नोव्हेंबर रोजी एका २८ वर्षीय तरुणाचा ११ व्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला. हा तरुण एका सीमा सुरक्षा दलाच्या उपमहानिरीक्षकाचा मुलगा आहे. सुरुवातीला त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र त्याच्या आई वडीलांनी पोलीसांना सांगीतले की, त्यांचा मुलगा दिवाळीसाठी लाइट लावत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि त्याचा मृत्यू झाला.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असीम खांची असे आहे. असीम हा सेक्टर ८५ मधील ‘द लिफ’ या सोसायटीच्या टॉवर ८ मधील फ्लॅट क्रमांक १० बी मध्ये राहत होता. गुरुग्राम पोलीसांच्या म्हणण्यांनुसार ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या तो फ्लटच्या बलकीतूनच पडला. तो बालकनीत उभा राहून दिवाळीसाठी लायटिंगची माळ लावत होता. त्याचवेळी त्याचा तोल गेला आणि तो दहाव्या मजल्यावरून खाली पडला असे त्याच्या आईने पोलीसांना सांगीतले. पोलीसांनी सांगीतले की, सोसायटीतील सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांनी त्याला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले.

पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करत त्यांनी पुरावे गोळा केले आणि असीमचा शव शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एवढेच नाही तर पोलीसांनी फ्लॅट आणि घटनास्थळ सील केले आहे. पोलीसांचा तपास पूर्ण झाल्यावर आणि आवश्यक पुरावे गोळा केल्यावर या घटनेमागेच नेमके कारण समोर येईल असे एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगीतले.

मृत तरुणाचे वडील सीमा सुरक्षा दलात उपमहानिरीक्षक

असीम खांची याचे वडील सत्यवान खांची हे सीमा सुरक्षा दलात उपमहानिरीक्षक असून ते सध्या ओडिशाच्या कोरापुट येथे तैनात आहेत मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर ते बुधवारी रात्री गुरुग्राम येथे पोहोचले. असीम हा आपल्या आई सोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्या आईने बीएससी पूर्ण केले होते आणि ती सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग शिकत होती. तर असीम हा मानेसरमधील एका खासगी कंपनीत काम करत असे.

पोलिसांनी काय सांगितल?

गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संदीप तुरान यांनी पोलिसांना सांगितले की “सुरुवातीला नेमकं काय घडलं हे स्पष्ट झाले नाही.” ते म्हणाले, घटनेच्या वेळी घरी फक्त असिमची आई होती. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, तिचा मुलगा बाल्कनीत दिवाळीची दिवे लावत असतांना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. आता पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *