भाजप आमदारांच्या शाळेचा अजब फतवा, पर्यूषण पर्वात डब्यात कांदा, लसूण आणण्यास मनाई
भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या शाळेने अजब फतवा काढला आहे. विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, लसूण आणण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर बटाटा, बीट आणू नये असंही शाळेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण वर्ज्य करण्यात आलं आहे. शाळेने घेतलेल्या या अजब निर्णयाचा अनेकांनी विरोध दर्शवला आहे. मीरा भाईंदर येथील एका शाळेत पर्युषणावरून गदारोळ माजला…
