केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. लोहगडावरून पडून केतनचा मृत्ययू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या घटनेनं आता वळण घेतल आहे. फोटोची पोज देताना केतन अग्रवाल घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली. केतनची होमारी पत्नी सिया हिच्यासह तिचा प्रियकर केतन याला याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात नव नवीन खुलासे समोर येत आहेत. केतन अग्रवाल याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी सिया काय करत होत. या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा देणारे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. हे फुटेज पाहून पोलिसांचा सिया आणि चेतन यांच्यावर असलेला संशय अधिक बळावला आहे. पुण्यातील एक कॅफेतील हे CCTV फुटेज आहे.
17 जून रोजी सिया काय करत होती?
20 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने 19 जून रोजी केतन आणि सिया लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. सियाच्या हट्टामुळे केतन लोहगडला जायला तयार झाला होता. लोहगडावर फोटोची पोज देताना तो घसरुन पडला, अशी प्राथमिक माहिती समोर आली होतं. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं उघड झाले. सिया आणि चेतन यांनी प्लान करुन केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. यांच्याबाबत पोलिस ठोस पुरावे गोळा करत आहेत. अशातच एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. केतनच्या मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजेच 17 जून रोजी सिया आणि चेतन दोघेही पुण्यातील एका कॅफेत भेटले होते. या कॅफेतील हे CCTV फुटेज आहे.
सिया आणि चेतन यांच्या हालचाली पाहून पोलिस चक्रावले
पोलिसांच्या तपासात नव नवीन खुलासे समोर येत आहेत. सिया आणि चेतन 17 जून रोजी संध्याकाळी पुण्यातील एका कॅफेमध्ये आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतन दुपारी 4:35 च्या सुमारास कॅफेमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. जवळपास एक तास दोघेही या कॅफेमध्ये बसले होते. सायंकाळी 5.30 च्या सुमारास निघून गेले. सिया गोयलनं याच कॅफेत बसून चेतनच्या मदतीने भावी पती केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचल्याचा दावा केला जात आहे. CCTV फुटेजमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ बसल्याचे दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहता ते अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सियाने यूट्यूबवर लोहगड किल्ल्याचे व्हिडिओ शोधले. गुगलवर षडयंत्राची माहिती घेतल्याचंही समोर आले आहे. पोलीस मोबाईल फोन, चॅट रेकॉर्ड, इंटरनेट सर्च हिस्ट्री आणि दोन्ही आरोपींमधील संभाषणांचीही तपासणी करत आहेत. डिजीटल पुरावे या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जात आहे.
केतनला मारण्याचा कट आधीच रचला होता
या दोघांनी केतनला मारण्याचा पहिला कट 14 जून रोजीच रचला होता. त्या दिवशी त्यांनी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन ‘साप आला’ अशी भीती दाखवत दरीच्या जवळ ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतू केतन त्यातून सुदैवाने वाचला. सियाने त्या घटनेला भलतंच स्वरुप दिले. केतनला सापापासून वाचवण्यासाठी आपण त्याला ढकलले आणि त्यानंतर त्याला मिठी मारुन वाचवलं, असं सियाने दावा केला होता, अशी माहिती विशाल अग्रवाल यांनी दिली. तसेच हा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, सियाने 18 जून रोजी तिच्या वाढदिवसाचा बहाणा करून केतनला पुन्हा लोहगडवर नेले आणि प्रियकराच्या मदतीने 350 फूट खोल दरीत ढकलून दिले. मृतदेह पाहिल्यानंतरही सियाच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख नसल्याने वडिलांना संशय आला आणि पोलिसांच्या सखोल तपासात या क्रूर कटाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
