Headlines

12 राज्यांना पूर आणि पावसाचा मोठा फटका, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड हाहाकार

देशात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला असून 12 राज्यांना पूर आणि पावसाचा मोठा फटका बसलाय. हिमाचल प्रदेशातून विध्वंस पाहिला मिळतोय. या भागात संपूर्ण परिसर जलमय झालाय. लाहौल-स्पितीमध्ये चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने पुलाचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेलाय. तर भारतीय हवामान विभागाने (IMD) आज 14 ऑगस्ट 2026 रोजी 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तर पावसादरम्यान वारे ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. राजस्थान, महाराष्ट्र आणि गोवा यांसारख्या पश्चिम भारतातील राज्यांमध्येही मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,दिल्ली-एनसीआर प्रदेशात ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हरियाणा आणि चंदीगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे. नद्यांना पूर आणि भूस्खलनासाठी तीव्र इशारा हवामान खात्याने दिला आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि आसपासच्या परिसरातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशाराही दिला आहे. शुक्रवारी ज्या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाची शक्यता आहे

पश्चिम राजस्थानमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *