Headlines

मराठी मनोरंजनसृष्टीला आणखी एक धक्का! 1990 चं दशक गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेतेने नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी आकस्मिक निधन झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीला अजून एक धक्का बसला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन झाले आहे. आपल्या अभिनयाने आणि लावणीच्या अदाकारीने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. प्रदीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालं. आज त्यांनी पुण्यात वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  त्यांनी आपल्या चार दशकांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कारकिर्दीत 75 हून अधिक चित्रपटांमध्ये आणि अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

आई, सासू अशा विविध भूमिका साकारत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या. मधू कांबीकर यांच्या कलाप्रवासाची दखल 2018 मध्ये घेण्यात आली. ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांच्या सुनेने, शीतल जाधव यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला होता.

लावणी सादर करतानाच प्रकृती बिघडली

27 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईतील माटुंगा येथील ‘यशवंत नाट्यमंदिर’मध्ये आयोजित ‘लावण्य संगीत’ कार्यक्रमात सादरीकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. प्रकृती साथ देत नसतानाही जिद्दीने त्यांनी लावणी पूर्ण केली, मात्र त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा (पॅरालिसिस) मोठा झटका आला. या झटक्यामुळे त्यांचा उजवा भाग बधिर झाला आणि त्यानंतर त्या दीर्घकाळ अंथरुणाला खिळून होत्या.

बीडमध्ये जन्म, लालबागमध्ये तमाशातून करिअरला सुरुवात

मधू कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला होता. कोल्हाटी समाजातील कलापरंपरेचा भाग असल्याने त्यांनी वयाच्या अतिशय लहान वयातच रंगमंचावर पाऊल ठेवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 1973 मध्ये मुंबईतील लालबाग येथील प्रसिद्ध ‘न्यू हनुमान थिएटर’मधून त्यांच्या व्यावसायिक कलाप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांनी तमाशाच्या फडातून सुरुवात करून पुढे रुपेरी पडद्यापर्यंत मजल मारली. त्यांनी गंभीर, विनोदी आणि सोशिक अशा विविध प्रकारच्या भूमिका अत्यंत ताकदीने जिवंत केल्या.

त्याचे गाजलेले चित्रपट

‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’ (पार्वती आजी), ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’, ‘सतीची पुण्याई’, ‘माझा छकुला’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुक्ता’.

गाजलेली नाटके/लोकनाट्ये:

‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पूरी करा’, ‘वस्त्रहरण’, ‘काशी मी राहू तशीच’ आणि ‘अजब न्याय’

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

‘शापित’ चित्रपटातील ‘बिजली’च्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. याच भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर (मराठी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘हेच माझं माहेर’ (1985), ‘रावसाहेब’ (1996), आणि ‘साद’ (1999, गुजराती) या चित्रपटांसाठी राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. मराठी सिनेसृष्टीतील त्यांच्या एकूण योगदानाबद्दल त्यांना 2018 साली ‘झी चित्र गौरव’ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *