पुण्यात आजपासून 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. आज झालेल्या पुणे जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. तसेच, जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्धता वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, सध्या पुण्यामध्ये 10 तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. शेतकरी पीक नुकसान, पंचनामे, महसूल, कृषी आणि जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. उद्योगांचे पाणी 20 कपातीचा निर्णय लागू राहणार आहे.
“दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. अल निनो डिसेंबरपासून कठीण होणार आहे. पुढील वर्षी मान्सून लांबणार आहे. 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी नियोजन बैठक झाली. जल सिंचन महापालिका आणि जिल्हा प्रश्नांची बैठक झाली. 100 टक्के पाणी धरणात नाही. 31 ऑगस्टपर्यंत पाणी वापरायचे आहे. खडकवासलामधील वापरण्यायोग्य पाणीसाठा बाष्पीभवन आणि मृतसाठा विचारात घेतला आहे. त्यानुसार 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी, तसंच पाणी वाचविण्यासाठी नियोजन करणे गरजचे आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत कपात निर्णय लागू होईल असं त्यांनी सांगितलं आहे. पिण्याच्या पाण्याचा अन्य वापर केला जातो, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहे. महावितरणच्या मदतीने विद्युत पुरवठा खंडित केला जाईल. रब्बी हंगामात पाणी देण्यासाठी पशुधन चारा, भाजीपाला आणि बारमाही नियोजन केले जाईल. भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार शेतीसाठी पाणी कपात केली होती. पशु संवर्धन विभागाला चारा उपलब्धतेसाठी उत्पादन आणि सध्या जिल्ह्याबाहेर वाहतुकीवर बंदी घातली आहे”.
पाणी टँकर ची नियोजन केले आहे. येत्या उन्हाळ्याचे नियोजन करावे लागणार आहे. भविष्यात गरज पडल्यास जलतरण तलाव, वॉटर पार्क आणि वॉटर बाटलिंग प्लांट बंद ठेवावे लागेल. शेतीसाठी पाणी आवर्तन सुरू करण्यासाठी महसूल, पोलीस, जलसिंचन आणि पाटबंधारे विभागाच्या समन्वयातून काम केले जाईल. सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तक्रार असेल त्या ठिकाणी पुन्हा पंचनामे करून योग्य मोबदला दिला जाईल. 20 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे करून राज्य सरकारकडे अहवाल पाठवणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.
