Headlines

Malegaon Crime : मालेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार अन् हत्या प्रकरण; साक्षीदार अन् सुनावण्या, अखेर न्याय मिळाला, आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ११ महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर २०२५ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी मालेगाव फास्टट्रॅक कोर्टात या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. या सुनावणीचा आज निकाल लागला आहे. कोर्टाने अल्पवयीन मुलीचे लचके तोडून तिला संपवणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विजय खैरनार (वय २९) असं आरोपीचं नाव आहे. दरम्यान, या खटल्यात प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

चॉकलेटचं आमिष दाखवून अपहरण

आरोपी खैरनारने डोंगराळे येथील रहिवासी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं होतं. यानंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिच हत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे पीडित चिमुकली आरोपीला ‘दादा’ म्हणायची. मात्र त्याने ‘दादा’ नावालाच कलंक फासला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *