इराण आणि अमेरिका या देशांमध्ये झालेल्या युद्धामुळे मागील काहीकाळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात चढ उतार राहिला. ज्याचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतींवर सुद्धा झाला. भारतातील प्रत्येक राज्यात, शहरात इंधनाचे दर हे वेगवेगळे असू शकतात. तेव्हा गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे इंधनाचे दर जाणून घ्या.
एक्सपोर्ट ड्यूटी कमी झाल्याने का बदलले दर?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. 15 ऑगस्ट पासून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवर एक्स्पोर्ट ड्यूटी कमी केली आहे. पेट्रोलवर एक्सपोर्ट ड्यूटी शुन्य तर डिझेलवर ड्यूटी 24 रुपये प्रति लीटर ठेवण्यात आली. तर एटीएफवर एक्स्पोर्ट ड्यूटी 19.5 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे. मात्र असं होऊन सुद्धा पेट्रोल आणि डिझेल यांच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्तरीय व्हॅट आणि स्थानिक करांमुळे शहरांमधील किंमतींमध्ये किरकोळ तफावत असू शकते.
देशातील विविध शहरात पेट्रोलचे दर :
अहमदाबाद : 101.81 रुपये प्रति लीटर
बैंगलोर : 111.68 रुपये प्रति लीटर
गुडगाँव : 102.97 रुपये प्रति लीटर
जयपुर : 113.19 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 113.51 रुपये प्रति लीटर
लखनऊ : 102.31 रुपये प्रति लीटर
नई दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
नोएडा : 101.96 रुपये प्रति लीटर
पुणे : 111.78 रुपये प्रति लीटर
देशातील विविध शहरात डिझेलचे दर :
अहमदाबाद : 97.92 रुपये प्रति लीटर
बैंगलोर : 99.56 रुपये प्रति लीटर
गुडगाँव : 95.64 रुपये प्रति लीटर
जयपुर : 98.25 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर
लखनऊ : 95.79 रुपये प्रति लीटर
नई दिल्ली : 95.2 रुपये प्रति लीटर
नोएडा : 95.44 रुपये प्रति लीटर
पुणे : 98.44 रुपये प्रति लीटर
