Pune Crime News: ठो ठो ठो…कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार झाल्याची घटना आज (बुधवारी, ता २५) समोर आली आहे. कोर्टाच्या समोर बंदूका आणि गोळ्या पडल्याचं दिसून येत आहे, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. दोन बंदूका आणि गोळ्या कोर्टासमोर पडल्याचं दिसून येत आहे. फायर केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा जण होते. कोयते आणि बंदूका घेऊन आरोपी आले होते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते, अशा गर्दीच्या वेळी ही घटना घडली आहे. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत जखमी झालेला व्यक्ती कोर्टात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटना घडल्यानंतर पोलिस काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले, गोळीबार झालेला व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तर पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की,गोळीबार करणारा अज्ञात आहे, तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एका गाडीवरती तिघे तर दुसऱ्या गाडीवरती चौघे जण आलेले होते, मोठी गर्दी होती, कोणीही वाचवायला पुढे गेलेले नाहीत, त्या आरोपींकडे कोयते आणि बंदूका होत्या, त्यामुळे परिसरात एकच भीती पसरली, पोलिस आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल होत आहे. घटनेची चौकशी केल्यानंतर तपास झाल्यानंतर माहिती देऊ अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. पुण्यात कोर्टाबाहेर ही घटना घडली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर 4 च्या बाहेर ही घटना घडली आहे. एकावर कोयत्याने आणि गोळीबार करत हल्ला झाला आहे.

घटनास्थळावर एक पिस्तुल आणि काडतुसांनी भरलेली मॅगझीन सापडली आहे. कोर्टाच्या आवारात उभ्या असलेल्या वकिलांनी सांगितले की, याठिकाणी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला पोलिसांनी रिक्षात टाकून रुग्णालयात नेले. हा व्यक्ती कोण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी पोहोचली आहे, आरोपींना शोधण्यासाठी सीसीटीव्ही तपासले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात झाली आहे. कोर्टाच्या आवारात उभ्या असलेल्या वकिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, सहा जण मारेकरी होते, आम्ही खिडकीत आलो, तेव्हा ते पळत होते. सुरुवातीला एकाने बंदूक काढली, इतरांनी कोयते काढले त्यानंतर फायरिंग झाली.

ज्याच्यावर वार झाले तो शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात पळत होता. एका व्यक्तीच्या हातात रिव्हॉल्व्हर होती, दोघांच्या हातात कोयते होते. हल्ला झालेला व्यक्ती घाबरुन खाली बसला होता. त्यानंतरही वरुन दोघांनी वार केले. हल्लेखोरांकडे अॅक्सेस आणि अॅक्टिव्हा असा दोन गाड्या होत्या. अक्सेस गाडीवर चौघे आणि अॅक्टिव्हावर दोघे बसून पळून गेले. त्यानंतर हल्ला झालेला व्यक्ती उठून बाजुला आला. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला रिक्षात टाकून रुग्णालयात नेले, अशी माहिती एका वकिलाने दिली.

ज्याच्यावर वार झाले तो शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात पळत होता. एका व्यक्तीच्या हातात रिव्हॉल्व्हर होती, दोघांच्या हातात कोयते होते. हल्ला झालेला व्यक्ती घाबरुन खाली बसला होता. त्यानंतरही वरुन दोघांनी वार केले. हल्लेखोरांकडे अॅक्सेस आणि अॅक्टिव्हा असा दोन गाड्या होत्या. अक्सेस गाडीवर चौघे आणि अॅक्टिव्हावर दोघे बसून पळून गेले. त्यानंतर हल्ला झालेला व्यक्ती उठून बाजुला आला. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला रिक्षात टाकून रुग्णालयात नेले, अशी माहिती एका वकिलाने दिली.

🐦 Kicau Mania

Nikmati suara burung terbaik setiap hari! Rawat, latih, dan cintai burung kicauanmu.


Posted

in

,

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *