देश
Live: बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा
nobanner
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं भूमिपूजन आज होणार आहे. शिवसेनेच्या विराट सभांनी गाजलेल्या शिवाजी पार्क मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक होत आहे. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह हा सोहळा होणार असून त्याचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित आहेत.
Share this: