देश
मोदींचा होळी साजरी न करण्याचा निर्णय, ट्विटरवरुन केलं जाहीर
- 62 Views
- March 04, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. तज्ञांनी नरेंद्र मोदींना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळेच नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “जगभरातील तज्ञांनी करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे”.
याआधी नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे करोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण मिळाल्यानंतर लोकांना न घाबरण्याचं तसंच एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं होतं. मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “घाबरण्याची गरज नाही. आपल्याला एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. स्वत: सुरक्षेसाठी एक छोटं मात्र महत्त्वपूर्ण पाऊल उचला”.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी एक पोस्टर ट्विट केलं. यामध्ये स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये वारंवार हात धुण्यासंबंधी तसंच डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श न करण्यासंबंधी सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन व्हायरसचा फैलाव होणार नाही. याआधी संसद परिसरात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा पार पडली.
करोना नक्की आहे काय?
करोना विषाणू म्हणजे काय आणि त्यावरील उपायांची माहिती देणारे चुकीचे संदेश समाजमाध्यमांमधून पसरत आहेत. तेव्हा याबाबत घाबरून न जाता योग्य माहिती समजून घेणे गरजेचे आहे. करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. चीनमधील वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे.
लक्षणे काय?
मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे असतात. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्युमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे प्रामुख्याने आढळते.
ही काळजी घ्या
– श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची खबरदारी घेणे
– हात वारंवार धुणे
– शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे
– अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये
– फळे, भाज्या न धुता खाऊ नये
कोणी विशेष काळजी घ्यावी?
– श्वसनाचा त्रास असणारे
– वरील लक्षणे कोणत्या आजारामुळे आहेत हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशातून प्रवास केला असल्यास.
– प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि बाधित देशात नुकताच प्रवास केला असल्यास अशा व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.