व्यापार
५ कंपन्यांचे भांडवल मूल्य २३,६५६ कोटींनी घटले
- 340 Views
- April 07, 2014
- By admin
- in व्यापार, समाचार
- 0 Comments
- Edit
सोमवार ७ एप्रिल २०१४ एक नजर (07-04-2014 : 04:06:00) मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या १0 सर्वोच्च कंपन्यांपैकी ५ कंपन्यांच्या बाजार भांडवलाचे मूल्य गेल्या आठवड्यात तब्बल २३,६५६ कोटींनी घटले. शेअर बाजारातील पडझडीचा हा परिणाम आहे. सर्वाधिक फटका एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपनी आयटीसीला बसला. सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर बाजाराला घसरण लागली आहे. नफा वसुलीचा हा परिणाम असल्याचे जाणकारांनी सांगितले. सेन्सेक्समधील ओएनजीसी, आयटीसी, सीआयएल, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे बाजार भांडवलाच्या मूल्यात घट झाली आहे. टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एसबीआय व एचडीएफसी यांच्या बाजार भांडवलाचे मूल्य मात्र वाढले आहे. आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य ११,0५५ कोटी रुपयांनी घटून २,७४,४६४ कोटी रुपये झाले आहे. सर्वोच्च १0 कंपन्यांतील ही सर्वाधिक घट आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य ४,५९४ कोटी रुपयांनी घटून १,७४,१२३ कोटी रुपये झाले आहे. आयसीआयसीआय बँकेचे भांडवल मूल्य ३,२७७ कोटींनी घटून १,४२,0८४ कोटी झाले. (प्रतिनिधी)