अपराध समाचार
हवाई दलाचा ट्रक दरीत कोसळला, ३ जवानांचा मृत्यू
- 166 Views
- August 21, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील चौहटनमधील डोंगर भागातील मार्गावरून जवानांना घेऊन जाणारा हवाई दलाचा ट्रक दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण दुर्घटनेत तीन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन जवान गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ट्रकमध्ये एकूण सहा जवान होते.
प्राप्त माहितीनुसार चौहटनमधील डोंगर भागातील मार्गावरून वायु सेनेचा ट्रक जात होता. दरम्यान चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो १०० मीटर खोल दरीत कोसळला. या भीषण दुर्घटनेत ट्रकमधील सहा जवानांपैकी तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व अन्य तीन जवान जखमी झाले.
दुर्घटनेची माहिती मिळताच चौहटन पोलीस व हवाई दलाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दरीत कोसळलेल्या ट्रकमधील गंभीर जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.