अपराध समाचार
सोलापुरात ST बसच्या धडकेत जीपचा चुराडा, पाच जणांचा मृत्यू
- 113 Views
- February 21, 2020
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
सोलापुरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैरागजवळील राळेरास येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. जखमीतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातेय. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बार्शीकडून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसने (MH 14 BT 3775) राळेरासमध्ये जीपला धडक दिली. यामध्ये जीपाचा चक्काचुर झाला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की जीपचा पुढील भाग पुर्णपणे चेपला गेला. या जीपमध्ये पंचायत समितीचे कर्मचारी जात होते. त्यातल्या 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
सोलापूर-बार्शी या रस्त्याची दुरावस्ता झाली आहे. रस्ता अतिशय खराब झाला असून त्यासाठी सतत आंदोलन सुरू असतात. रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं, यासाठी स्थानिकांनी अनेक निवेदनही दिलं आहे. पण प्रत्येक्षात रस्त्याचं काम सुरू झालं नाही.