व्यापार
सेन्सेक्सच्या तेजीला अखेर ब्रेक
- 303 Views
- April 06, 2014
- By admin
- in व्यापार, समाचार
- 0 Comments
- Edit
रविवार ६ एप्रिल २०१४ एक नजर (04-04-2014 : 02:11:05) मुंबई : मुंबई शेअर बाजाराचे सलग सहा दिवसांचे तेजीचे सत्र गुरुवारी थांबले. ४२ अंकांच्या घसरणीसह बाजार ऐतिहासिक उच्चांकावरून परतला. बँकिंग आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात झालेल्या नफा वसुलीमुळे बाजार खाली आला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २२,६२0 या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. सलग नवव्या दिवशी सेन्सेक्सचा हा विक्रम होता; परंतु सत्राच्या अखेरीस मोठय़ा प्रमाणात नफा खोरी सुरूझाल्याने बाजार खाली आला. अखेरीस सेन्सेक्स ४२.४२ अंकांच्या घसरणीसह २२,५0९ अंकांवर बंद झाला. व्यावसायिक सत्रादरम्यान बाजार २२,३६९ पर्यंत कोसळला होता. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही १६.४५ किंवा 0.२४ टक्क्यांनी कोसळून ६,७३६.१0 अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान निफ्टीने ६,७७७ चा उच्चांक, तर ६,६९६ चा निचांकी पातळीही गाठली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अँक्सिस बँक,भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, भारती एअरटेल, व भेलसहित १७ शेअर्सची घसरगुंडी झाली. तर इन्फोसिस, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब, हिंदुस्थानयूनिलिवर, मारुती सुझुकी, सनफार्मा आणि स्टरलाईटचे शेअर्स फायद्यासह बंद झाले. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये नफा वसुली झाल्याने २ टक्क्यांची घसरण झाली. रिझर्व्ह बँकेने आयडीएफसीला बँक स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. ३0 पैकी १७ कंपन्यांचे शेअर्स कोसळले, तर १३ कंपन्यांचे शेअर्स वधारले. आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल बघायला मिळाला. (प्रतिनिधी)