खेल
सानिया सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर
सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे.
सानिया आणि तिचा क्रोएशियन पार्टनर इव्हान डोडिंगनं मिक्स डबल्समध्ये दिमाखात ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली.
सानिया-डोडिंग जोडीनं समांथआ स्टोसूर आणि सॅम ग्रोथ या जोडीवर 6-4,2-6,10-5 अशा फरकानं मात केली.
दुसरा सेट गमावल्यानंतर सानिया-डोडिंगनं ही लढत 1 तास आणि 18 मिनिटांत जिंकली. आता, सानियाकडून फायनलमध्येही अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पेस आणि बोपन्नाला झटपट गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर भारताच्या साऱ्या आशा या सानियावर आहेत.