देश
संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक
कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी सक्तवसुली संचलनालयाने सुजित पाटणकर यांना अटक केली. दरम्यान, न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधी 20 जुलैला कोविड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली होती. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरलाही अटक करण्यात आली होती. संजय राऊतांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.
ईडीने सुजित पाटकर आणि डॉ किशोर बिसुरे यांना अटक केली होती. किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे.